कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील ‘या’ महत्वाच्या पुलावरून आजपासून वाहतूक पूर्णपणे बंद

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील (Kolhapur-Gaganbawda road) बालिंगा पूल (Balinga Bridge) धोकादायक स्थितीत असल्याने आज (ता. 25) पासून या पुलावरून पूर्ण वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद करा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असंही त्यांनी नमूद केलं. बालिंगा पूल (Balinga Bridge) वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे पर्यायी पुलाचे काम केले जाणार होते. अजून पर्यायी पुलाचे काम सुरू नाही. दरम्यान, सध्या असणाऱ्या पुलाला पाणी लागल्यामुळं हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे.

त्यामुळे वाहतुकीसाठी कोणतीही रिस्क न घेता जिल्हा प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी सर्वच वाहनांना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुराचे पाणी वाढल्यामुळे काल दुपारी अचानक कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक बालिंगापूर येथे बंद करण्यात आला. त्यामुळे कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांना घरी परत येता येत नव्हते.

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्‍ये सर्वाधिक 104 मिलिमीटर पाऊस; कोयनेतून 1 हजार 50 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग पोलीस आणि वाहतूकदारांमध्ये जोरदार वाद झाले. पुराचे पाणी रस्त्यावर आले नसतानाही अचानक पूल बंद करून वाहतूकदारांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप लोकांकडून करण्यात आला. दरम्यान, आजपासून हा रस्ता दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *