मुदाळतिट्टा-निपाणी वाहतूक बंद; गारगोटी-कोल्हापूर वाहतूक सुरळीत
वेदगंगा नदीच्या पाणी पातळी घट झाल्याने गारगोटी-कुर मार्गावरील वाहतूक (Transportation) सुरू झाली आहे. मुरगुड नजीक स्मशान शेड जवळ रस्त्यावर अद्यापही दोन फूट पाणी असल्याने मुदाळतिट्टा-निपाणी मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. पर्यायी कुर मडिलगे -मुरगुड- सेनापती कापशी मार्गे गडहिंग्लज व निपाणी तसेच मुदाळतिट्टा-निढोरी- आप्पाचीवाडी मार्गे निपाणी वाहतूक सुरु आहे.
काल दिवसभर पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळी अंदाजे दीड फुटापर्यंत घट झाली आहे. त्यामुळे मडीलगे कुर दरम्यान रस्त्यावर आलेले पाणी सोमवारी तीन वाजताच पूर्ण कमी झाले आहे. सोमवारी जरी येथे पाणी असले तरी वाहतुकीवर कोणताच परिणाम झालेला दिसून येत नव्हता, कारण पाणी पातळी कमी होती. त्यामुळे गारगोटी-कोल्हापूर वाहतूक सुरळीत सुरू होती.
देवगड-निपाणी मार्गावर मुरगुडच्या स्मशान शेड नजीक व व शिंदेवाडी यमगे दरम्यान रस्त्यावर अद्यापही पाणी असल्याने वाहतूक (Transportation)पूर्णपणे बंद झाली आहे. निपाणी सेनापती कापशी मुरगुड गारगोटी अशी वाहतूक सुरू आहे. गेले दोन दिवस संततधार दमदार पावसामुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयाला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. जन जीवन विस्कळीत झाले होते.