“देवेंद्र फडणवीस यांना सारं पक्क माहीतीये पण, तरी ते देखल्या देवा दंडवत करतायेत”
(political news) ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. एका म्हणीच्या आधारे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद राहणार नाही, पुन्हा एकदा असा दावा राऊतांनी केला आहे. तसंच 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे.
आम्ही जेव्हा म्हणतो की एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहणार नाहीत तेव्हा आमचं बोट सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे आहे. सर्वोच्च न्याालयाने दिलेले जे निर्देश आहेत ते जर विधानसभा अध्यक्षांनी पाळले. तंतोतंत त्याचं पालन केलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात काही तथ्य राहात नाही. ते देवेंद्रजी यांनाही पक्क माहिती आहे. पण तरिही शेवटी देखल्या देवा दंडवत असं सुरू आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
देवेंद्र फडणविस काय बोलतात यापेक्षा विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट के म्हटलं हे महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस काय अध्यक्ष आहेत का? सूर्य मावाळणारच आहे, असं संजय राऊत म्हणालेत. (political news)
काहीही निर्णय घेतला तरी सरकार जाणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागणार आहे. 10 ऑगस्टपर्यंत हे सारं घडेल. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रिपद जाईल, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर म्हणाले…
उद्धव ठाकरे यांची मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. त्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. उद्या मुलाखत येईल. त्यापूर्वीच टीका करायला लागलेत. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट होतील. मुलाखत येण्याआधीच मुलाखतीची चर्चा सुरू होतेय. टीका करणाऱ्यांना काही उद्योग नाहीत का? निधी वाटप सुरू आहे. त्यावर बोला, असं म्हणत राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे.