हुपरी ते इंगळी रस्ता वहातुकीसाठी बंद
राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना भगदाढ पडली आहेत. आज हुपरी शहरालगत असणाऱ्या हुपरी ते इंगळी रस्ता (road) खचल्याने हा रस्ता वहातुकीसाठी बंद करण्यात करण्यात आला आहे.
हुपरी शहराला जाणारा हा रस्ता (road) असून रस्त्यावर मोठे भगदाढ पडल्याने इंगळी गावच्या ग्रामस्थांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचे मोठा हाल झाले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
जिल्ह्यात अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.