टाकळीवाडी येथील शिवकालीन पुरातन हुड्याची मोजणी न झालेस आमरण उपोषणाचा इशारा –शिवगर्जना व स्पोर्ट्स अकॅडमी

पत्रकार नामदेव निर्मळे
टाकळीवाडी येथील शिवकालीन पुरातन हुडा (Ancient Huda) अनेक वर्षांपासून नादुरूस्त व दिवसेंदिवस हुड्याभोवती अतिक्रमण होत असलेने शिवगर्जना तरूण मंडळ व स्पोर्ट्स अकॅडमी चे तरूणांनी यांची दखल घेऊन वारंवार ग्रामपंचायतीकडे हुडा मोजणीसाठी व सुशोभीकरणासाठी तगादा लावल्यानंतर दि.21/4/2023ई रोजी उप अधीक्षक भुमी अभिलेख शिरोळ येथे सि.स.नं.1641,1642ची मोजणी फी भरलेली आहे.



परंतू अद्याप पुरातन हुड्याची (Ancient Huda) मोजणी झालेली नाही. वेळोवेळी विचारणा करून देखील ग्रामपंचायत व भुमी अभिलेख कार्यालय शिरोळ, दखल न घेता बेदखलपणाने वागत असलेने, सर्व तरूणांनी तात्काळ मोजणी न झालेस ग्रामपंचायत टाकळीवाडी समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिले आहे.
तसे तहसिलदार सो, शिरोळ उपाधिक्षक, भुमीअभिलेख, शिरोळ,ग्रामपंचायत, टाकळीवाडी पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे कुरूंदवाड यांना निशांत गोरे, कृष्णा कोळी, सौरभ शिंदे, भरत सलगरे, सुधीर गोरे, निलेश वनकोरे, दत्तात्रय बदामे, श्रीमंदर एक्संबे यानी निवेदन दिले आहे.