Shocking!!! करीना कपूर खानची निवृत्तीबाबत मोठी घोषणा

(entertenment news) बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानने चित्रपटसृष्टीमध्ये मोठा टप्पा पार केला आहे. या काळात तिने अनेक प्रकारची पात्रे अतिशय सुंदरपणे परदावर मांडली. करीना गेल्या 22 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे असं म्हणं वावग ठरणार नाही. तिन अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दोन मुलांची आई असून तिने अभिनयाला कधीही मागे सोडलं नाही.

सध्या करीना तिच्या जाने जान या चित्रपटातून ती ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत आहे. पण अशात तिने वयाच्या 43 वर्षी निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे.

सिनेसृष्टीला बाय बाय?

जाने जान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बेबो सध्या बिझी आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तिच्या वाढदिवसी म्हणजे 21 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिने निवृत्तीबाबत मोठी घोषणा करुन चाहत्यांना धक्का दिला.

या मुलाखतीच्या वेळी करीना म्हणाली की, ”मी अजूनही आपल्या अभिनयासाठी उत्सुक आहे. जर मी हरले तर मला वाटले की, मी निवृत्त व्हावं. ती पुढे म्हणाली की, वयाच्या 43 व्या वर्षीही सेटवर येण्यासाठी ती उत्साही आणि कॅमेऱ्या समोर जाण्याची इच्छा तिची आजही आहे. ”

या मुलाखतीच्या वेळी ती निवृत्तीसंदर्भात मनमोकळे पणाने बोलली. ती म्हणाली की, मला माहिती आहे की ज्या दिवशी हा उत्साह नसेल तेव्हा मला समजेल की मी काम करणं बंद केलं पाहिजे. उत्साह नसेल तर मी ते काम करत नाही, मी अशा प्रकारची व्यक्ती आहे. मला प्रत्येक गोष्टीची खूप आवड आहे. मला जेवण आवडतं, मित्रमैत्रिणींसोबत फिरणं आवडतं आणि प्रवास करणे तर सर्वाधिक आवडतं. (entertenment news)

त्यामुळे एक दिवस असा आला की, जेव्हा मला कळलं की, या सगळ्यांना मी गमवतेय त्यादिवशी मी निवृत्त होईल. त्यावर तिला विचारण्यात आलं पण साधारण कुठल्या वयात तू सिनेसृष्टीला रामराम करशील.

त्यावर बेबो म्हणाली की, मला आशा आहे की 83 किंवा 93,…पण मला माहित नाही! कारण मला काम करत राहायचं आहे. करीना कपूर तिच्या आगामी जाने जान या चित्रपटासाठी उत्सुक असून ती यापूर्वी आमिर खानसोबत लाल सिंह चढ्ढा या चित्रपटात दिसली होती. जाने जान शिवाय करीना कपूर खान हंसल मेहताचा ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ हा थ्रिलरमध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *