शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन महिलेवर अत्याचार
(crime news) शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एकास अटक केली. सचिन यशवंत शिंदे (वय ४३, रा. एनडीए रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिला आणि आरोपी शिंदे ओळखीचे आहेत. शिंदेने महिलेला वारजे भागात भेटण्यासाठी बोलावले होते. तेथे महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. महिलेला चक्कर आल्यानंतर शिंदेने तिची मोबाइलवर छायाचित्रे काढली.
समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेला त्याने धमकावण्यास सुरुवात केली. तसेच त्याने जातीवाचक शिवीगाळ केली. महिलेने याबाबत तक्रार दिल्यानंतर बलात्कार, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिंदेला अटक करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे तपास करत आहेत.