लोकप्रिय अभिनेत्याच्या अल्पवयीन लेकीची आत्महत्या

(crime news) दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता, कंपोजर आणि निर्माता विजय एंटनी याची लेक मीरातं आज सकाळी निधन झालं आहे. मीरा ही 16 वर्षांची होती. मीरानं आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, मीराला चेन्नईत असलेल्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मीराला त्या परिस्थितीत पाहिल्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयची लेक मीरा ही डिप्रेशनमध्ये होती आणि तिच्यावर उपचार देखील सुरु होते.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, विजय एंटनीची लेक मीरानं सकाळी 3 वाजता चेन्नईत स्थित असलेल्या घरी मृतावस्थेत सापडली. ती 16 वर्षाची असून चेन्नईच्या एका मोठ्या शाळेत शिकत होती. रिपोर्ट्सनुसार, मीरा डिप्रेशनमध्ये होती. त्यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीनं तिला रुममध्ये गळफास घेतलेल्या परिस्थितीत पाहिले. त्यानंतर तिला लगेच रुग्णालयात घेऊन जाण्यात आले तर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सध्या पोलिस अधिकारी या प्रकरणात तपास करत आहेत. तर विजय आणि त्याच्या पत्नीनं याविषयी कोणतीही ऑफिशिअल स्टेटमेंट केलेलं नाही.

विजय एंटनी एक लोकप्रिय कंपोजर आहे. तो तमिळ चित्रपटांमध्ये काम करतो. अनेक वर्षे संगीतकार राहिल्यानंतर निर्माता, अभिनेता, गीतकार, संपादक, ऑडियो इंजीनियर आणि दिग्दर्शक देखील आहे. त्यानं फातिमा विजय एंटनीशी लग्न केलं. त्याचं एक प्रोडक्शन हाऊस असून त्यावर देखील त्याची पत्नी फातिमा लक्ष ठेवायची. विजय आणि फातिमा यांना दोन मुली असून मीरा आणि लारा अशी त्यांची नाव आहेत. कंपोजर विजय एंटनी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कामात व्यस्त होता. तर त्याचा आगामी चित्रपट ‘रथम’ च्या प्रदर्शनाच्या तयारीत देखील आहे. त्यानी नुकतंच एका कॉन्सर्टचे आयोजन केले होते. त्याचं हे कॉन्सर्ट खूप हिट ठरलं होतं. (crime news)

चित्रपटसृष्टीत या आधी देखील अनेकांनी आत्महत्या केली आहे. मात्र, अनेकांच्या आत्महत्येचा कारण काही समोर आले नाही. त्यात पहिल्यांदा कोणत्या स्टार किडनं असं काही केल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. इतकचं नाही तर मीरानं इतकं मोठं पाऊल उचलल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की तिनं असं का केलं. तिला कोणत्या गोष्टींची कमी नाही काहीही त्रास नाही… मग नक्की काय होतं की ती डिप्रेशनमध्ये गेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *