हलसवडेत जमीन वादातून खून

(crime news) हलसवडे (ता. करवीर) येथे जमिनीच्या वादातून कुर्‍हाड व चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आला. श्रीमंत पांडुरंग कांबळे (वय 51) असे त्यांचे नाव आहे. शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दशरथ रुद्राप्पा कांबळे, मोहन दशरथ कांबळे, रघुनाथ दशरथ कांबळे, वैभव नामदेव कांबळे यांना गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली. एका अल्पवयीनलाही ताब्यात घेतले आहे. यावेळी विनोद जनार्दन देसाई व फिर्यादी ऋतुराज श्रीमंत कांबळे जखमी झाले आहेत.

हलसवडेत गट नंबर 517 मधील वाटणीवरून बर्‍याच वर्षांपासून शेताचा वाद सुरू आहे. शनिवारी दुपारी दोन गटांत किरकोळ वाद झाला. हा वाद रात्री उफाळून आला. काही अंतरावर राहत असलेल्या श्रीमंत कांबळे यांच्या घरावर एक गटाने चाल करत ‘तुला आज संपवतो, सोडत नाही’ अशी घरासमोर येऊन दशरथ कांबळे व त्याची दोन मुले व दोन नातू यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. श्रीमंत कांबळे घराबाहेर येतातच त्यांच्यावर कुर्‍हाडीचे व चाकूने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला.

यावेळी झालेल्या मारामारीत विनोद देसाई व ऋतुराज कांबळे जखमी झाले. घटनेची माहिती मिळतातच गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड घटनास्थळी आले. घटनेचा पंचनामा करण्यात आला. श्रीमंत कांबळे यांचे पार्थिव विच्छेदनासाठी सीपीआर येथे पाठविण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत. करवीरचे उपाधीक्षक संकेत गोसावी यांनी सीपीआर येथे येऊन माहिती घेतली. (crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *