आदित्य रॉय कपूरसोबत अनन्या पांडेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
(entertenment news) अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून आहे. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. मात्र दोघांनी माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर रिलेशनशिपबद्दल कोणतीच जाहीर कबुली दिली नाही. यादरम्यान अनन्या आणि आदित्यचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. डिनर डेटनंतर हे दोघं एका व्यक्तीशी बोलत असताना दिसत आहेत आणि कोणीतरी त्यांचा हळूच व्हिडीओ शूट केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत अनन्या आणि आदित्यचा रोमँटिक अंदाज स्पष्ट पहायला मिळतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अनन्या आणि आदित्य हे मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारत उभे असल्याचं दिसतंय. दोघांनीही यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. एका व्यक्तीसोबत गप्पा मारत असताना अनन्या आदित्यच्या खांद्यावर डोकं टेकून उभी असते. त्याचसोबत त्याच्या हाताभोवती ती स्वत:चा हात ठेवते. आदित्य आणि अनन्या यांचं प्रेम या व्हिडीओत स्पष्ट पहायला मिळतंय. यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या दोघांच्या जोडीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर काहींनी हा ‘दिखावा’ असल्याचं म्हटलंय.
गेल्या वर्षी अनन्याने जेव्हा ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. तेव्हापासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. यावेळी करण जोहरने प्रेक्षकांना दोघांच्या रिलेशनशिपबद्दल हिंट दिली होती. त्यानंतर दोघांनी एकत्र अभिनेत्री क्रिती सनॉनच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. जुलै महिन्यात अनन्या आणि आदित्य पोर्तुगालमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या रोमँटिक व्हेकेशन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (entertenment news)
याआधी नेटकऱ्यांनी या दोघांच्या वयातील अंतरावरून कमेंट्स केले होते. मात्र जर सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्या वयातील 14 वर्षांचं अंतर योग्य वाटत असेल तर आदित्य आणि अनन्या यांच्यातील 15 वर्षांचं अंतर मोठं का वाटतंय, असाही सवाल काही चाहत्यांनी केला होता. काहींनी अनन्याचीही बाजू घेतली होती. ती अभिनेत्री म्हणून कमकुवत असली तरी जोडीदार म्हणून उत्तम असेल, असं मत नेटकऱ्यांनी मांडलं होतं. तर आदित्यला अनन्यापेक्षा खूप चांगली मुलगी भेटू शकते, असंही काहींचं म्हणणं आहे.