शाहरुख खान – प्रियांका चोप्रा खरंच होते रिलेशनशिपमध्ये? किंग खानने सोडलं मौन

(entertenment news) अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर चाहत्यांमध्ये देखील प्रियांका आणि शाहरुख यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आजही रंगणाऱ्या चर्चा कमी झालेल्या नाहीत. प्रियांका हिने अमेरिकेतील गायक निक जोनस याच्यासोबत लग्न केलं आहे. पण लग्नाआधी अनेक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यांसोबत प्रियांका हिच्या नावाची चर्चा रंगली होती. या यादीमध्ये किंग खान याचं देखील नाव होतं. पण आता अभिनेत्याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान, प्रियांका चोप्रा हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल बोलताना दिसत आहे. अभिनेता म्हणाला, ‘मला एक गोष्टीचं अधिक दुःख होत आहे, एक महिला जिने माझ्यासोबत काम केलं, तिच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हे अत्यंत अपमानास्पद आहे…’

‘मी काही केलं आहे यासाठी मला वाईट नाही वाटत. पण माझ्या जवळच्या मैत्रीणीला ऐकावं लागत आहे, म्हणून मला वाईट वाटत आहे. यासर्व गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो. ज्यामुळे नाती खराब होतात. प्रियांका हिने माझ्यासोबत प्रवास सुरु केला. आम्ही ऑनस्क्रिन, ऑफस्क्रिन चांगला वेळ व्यतीत केला…’

पुढे किंग खान म्हणाला, ‘आमच्या नात्याच्या चर्चा रंगल्या पण प्रियांका प्रचंड समजदार आहे. तिने आमच्या मैत्रीवर कोणताही परिणाम होवू दिला नाही.’ सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

प्रियांका आणि शाहरुख यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी ‘डॉन’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमातील दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. ‘डॉन’ सिनेमानंतरच प्रियांका आणि शाहरुख यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण याबद्दल प्रियांका हिने आजपर्यंत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. (entertenment news)

प्रियांका चोप्रा आज तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. अभिनेत्री सरोगेसीच्या माध्यमातून एका मुलीला जन्म देखील दिला आहे. अभिनेत्री कायम लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्री पती आणि लेकीसोबत अमेरिकेत राहते…

सोशल मीडियावर प्रियांका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील प्रियांका हिच्या फोटो आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *