मलायकाचा मराठमोळा लूक, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला

(entertenment news) ९० च्या दशकातील बॉलिवूडच्या अभिनेत्रींचं सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना सुंदर दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी अनेक टिप्स देत असतात. आता देखील अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे. सध्या सोशल मीडियावर मलायका हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील मलायकाच्या माराठमोळ्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. वयाच्या ५० व्या वर्षी देखील मलायका हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. मलायका कायम तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. मराठमोळ्या अंदाजात मलायका हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

मलायका अरोरा बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर मलायका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

दरम्यान, अभिनेत्रीने इन्स्टाग्राम एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मलायका मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. हातात लाल बांगड्या, कपाळावर चंद्रकोर, केसात माळलेला गजरा… हा मराठमोळा शृंगार अभिनेत्रीवर उठून दिसत आहे.

 

सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मलायका हिच्या लूकची चर्चा रंगत आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘पारंपरिक ते अधिक सुंदर!’ असं लिहिलं आहे. चाहते देखील मलायका हिच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (entertenment news)

मलायका हिचं खासगी आयुष्य

मलायका गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मलायका आणि अर्जुन कायम इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबत फोटो, व्हिडीओ पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. मलायका आणि अर्जुन यांच्यामध्ये वयाचं अंतर असल्यामुळे दोघांना ट्रोल केलं जातं.

मलायका हिचं पहिलं लग्न अभिनेता अरबाज खान याच्यासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या १९ वर्षांनंतर मलायका – अरबाज यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर देखील मलायका – अरबाज मुलासाठी एकत्र येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *