बॉलिवूडच्या तीन खानांपैकी एक असलेल्या आमिरचं नेटवर्थ किती?

(entertenment news) बॉलिवूडमधील मि.परफेक्शनिस्ट अशी अभिनेता आमिर खानची ओळख असून तो नामवंत अभिनेत्यांच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. गेल्या 30 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रीय असलेला आमिर हा वर्षभरात केवळ एकच चित्रपट करतो, पण तोही सुपरहिट ठरतो. त्यामुळेच त्याला विचारवंत अभिनेता मानलं जातं. आज, म्हणजेच 14 मार्च रोजी आमिर खान त्याचा 59वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडच्या तीन खानांपैकी एक असलेल्या आमिरचं नेटवर्थ किती आहे, त्याची संपत्ती किती आहे, ते त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया.

गेल्या ३ दशकांहून अधिक काळापासून आमिर हा हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतोयॉ. त्याने करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पदार्पणातच चॉकलेट बॉचा शिक्का बसलेल्या आणिरने विविध जॉनरचे चित्रपट करून तो शिक्का पुसला आणि एक अभिनेता म्हणून त्याने नाव कमावलं. चित्रपट कोणताही असो, त्यासाठी तो कठोर मेहनत ककतो, त्या भूमिकेत घुसतो म्हणून तर काही वेळा त्याच्या चित्रपटासाठी २-३ वर्षांचा काळही लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून तर तो वर्षाला एकच चित्रपट करतो. एवढी मेहनत केल्यामुळेच तो आज मि.परफेक्शनिस्ट नावाने प्रसिद्ध आहे. कठोर मेहनतीच्या जोरावरच त्याने कोट्यवधींची संपत्ती कमावली असून, आज तो आलिशान आयुष्य जगतोय.

फिल्म्स शिवाय या माध्यमातूनही करतो कमाई

इतर अभिनेत्यांप्रमाणे आमिर खान हा देखील चित्रपटांशिवाय, जाहिरात आणि निर्मितीतून कमाई करतो. त्याचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊसही आह. रिपोर्ट्सनुसार, आमिर हा एका जाहिरातीसाठी 10 ते 12 कोटी रुपये आकारतो. याशिवाय तो एका चित्रपटासाठी 85 ते 100 कोटी रुपये फी घेतो. तसंच चित्रपटाच्या कमाईचा काही शेअरही आमिरला मिळतो, अशी चर्चा आहे. (entertenment news)

किती आहे आमिरचं नेटवर्थ ?

आमिर खानच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 1862 कोटी रुपये आहे. त्याचे मुंबईत आलिशान घर आहे. ज्याची किंमत सुमारे 18 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय आमिरकडे आणखी एक मालमत्ता आहे ज्याची किंमत 7 कोटी रुपये आहे. आमिर खानला लक्झरी कार्सचीही खूपच आवड आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, रोल्स रॉयस आणि फोर्ड सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे जवळपास 9 ते 10 आलिशान गाड्या आहेत. ज्याची एकूण किंमत 15 कोटींच्या आसपास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *