माणुसकी, नातं सगळंच विसरला.., भावासह मिळून भयानक कृती

(crime news) पैसा.. प्रत्येकालाच हवा असतो, पण काहींना त्याचा मोह असतो. पण काहीवेळा पैशांचा हा मोह माणसाला इतक्या खालच्या थराला नेतो की तो पैसा मिळवण्याच्या नादात माणूस चांगल्या-वाईटाचा विचारच सोडून देतो. आपण काय करतोय याची शुद्धच त्याला रहात नाही आणि तो अशी एखादी भयानक कृती करून बसतो, ज्यामुळे त्याच्यासोबत इतरांचं आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली. जेथे प्रॉपर्टीच्या मोहात एका मुलाने स्वत:च्या डोक्यावरचं पित्याचं छत्र, स्वत:च हिरावून घेतलं. त्या इसमाने, त्याच्या भावासह मिळून स्वत:च्याच, जन्मदात्या पित्याचीच हत्या केली. याप्रकरमी पोलिसांनी रामदास कृष्णा डोंगरकर (वय 35)आणि विलास चिंटू डोंगरकर (वय 50)या दोन आरोपींना अटक केली आहे. कृष्णा राम डोंगरकर असे मृत इसमाचे नाव आहे.

कासा पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमटा घाटाळपाडा येथील जंगलात 9 मार्च रोजी कृष्णा राम डोंगरकर यांचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर या संदर्भात तपास सुरू करण्यात आला. तेव्हा त्यांन समजलं की गेल्या काही दिवसांपासून, मृत कृष्णा डोंगरकर आणि त्यांच्या भावामध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता. कृष्णा यांनाही त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा होता. त्याच मुद्यावरून त्यांच्यात बरीच भांडणं सुरू होती. (crime news)

त्यानंतर कृष्णा यांचा पुतण्या विलास चिंटू डोंगरकर आणि त्यांचा स्वत:चाच मुलगा रामदास कृष्णा डोंगरकर या दोघांनी मिळून कट रचला. मृत कृष्णा डोंगरकर हे घरात झोपलेले असतानाच विलास आणि रामदास या दोघांनी मिळून कृष्णा यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह जवळच्याच जंगलात फेकून दिला, असे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक केली असून हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *