राहुल गांधींच्या सभेआधी संजय राऊतांचं मोठं विधान

(political news) काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज या यात्रेची सांगता सभा होणार आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीवर संजय राऊत यांनी भाष्य केलंय. यात वंचितला सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीचं मत काय आहे? यावर राऊतांनी भाष्य केलं. वंचितला सोबत घेतल्याशिवाय पुढे जाण्याचा महाविकास आघाडीचा कोणताही विचार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

वंचितबाबत राऊत म्हणाले…

वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सामील होऊ शकते. तशी चर्चा या पक्षांमध्ये सुरु आहे. आज काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. अशात वंचितसोबतच्या आघाडीवर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. आमचा त्यांच्याशी प्रस्ताव संदर्भात चर्चा सुरू आहे. आजच्या भाषेत ‘डायलॉग’ असं म्हणत आहे. संविधान संकटात असताना सर्वजण आपण समाजाने एकत्र यावे वंचितांचे देखील तीच इच्छा आहे. आम्ही चार जागा संदर्भात प्रस्ताव दिला आहे. त्याच्यावर प्रकाश आंबेडकर विचार करतील, असं राऊत म्हणाले.

वंचितला चार जागांचा प्रस्ताव- राऊत

माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचे चर्चा सुरू आहे. लोकशाही धोक्यात आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्याशी चर्चा सुरू आहे आणि प्रकाश आंबेडकर यांचे भूमिका आहे या देशातील संविधान लोकशाही धोक्यात गरीब माणूस धोक्यात आहे. मग त्याची फसवणूक होत आहे आणि त्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या संघर्ष सुरू आहे. आम्ही 4 जागा ची ऑफर आम्ही दिली आहे. 400 पारचा नारा भाजपचा आहे. त्यांना थारा मिळू नये, म्हणून विरोधी पक्ष एकत्र येत लढा देत आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. (political news)

“आजच्या सभेला सर्व नेते येणार”

पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला गेले नाहीत, हे या देशाची जनता विसरणार नाही. राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊ शकतात. राहुल गांधी मणिपूरमध्ये राहिले. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्याप माणिपूरला जाऊ शकले नाहीत. याचे कारण काय? तुम्ही अखंड हिंदुस्तानची भाषा करत आहे त्यात मणिपूर येत नाही का? जे मणिपूरला गेले नाहीत ते या वेळेला कायमचे गुजरातला जातील. राहुल गांधी सभेला आज सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, असं संजय राऊतांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *