मुलाच्या शैक्षणिक फीसाठी वडिलांचं धक्कादायक कृत्य

(crime news) पैशांसाठी एखाद्याला लुटल्याच्या किंवा चोरीच्या घटना नव्या नाहीत. रोज हत्येच्या अनेक घटना घडत असतात. अलीकडेच गुजरातमधून अशीच एक घटना समोर आली आहे. मुलाच्या शाळेच्या फीसाठी एका 52 वर्षांच्या व्यक्तीने एका ज्येष्ठाची हत्या (Murder of Businessman) करून त्याला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुजरातच्या मुंद्रा जिल्ह्यातील वडाळा या गावात घडली असून मृत व्यक्ती ही मुंबईमध्ये राहत होती. 25 एप्रिलच्या रात्री मुंबईतील 60 वर्षीय बिझनेसमन मनसुख सातारा यांची मुंद्रामध्ये हत्या झाली होती. या हत्येनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपी वाला गढवी याला अटक केली. त्यानंतर रविवारी आरोपीने या प्रकरणाशी संबंधित धक्कादायक खुलासे केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाला गढवीचा मोठा मुलगा मुंद्रा (Mundra) येथे बारावीत शिकतो. त्याची हॉस्टेल आणि शिक्षणाची फी (Educational Fees) भरण्यासाठी आधीच कर्जबाजारी असलेल्या वालाला 35,000 रुपयांची गरज होती. हे पैसे कसे जमवायचे, या विचारात तो होता. अशातच मुंबईतील बिझनेसमन मनसुख सातारा हे त्यांच्या मूळ गावी वडाळा येथे गुंतवणुकीसाठी (Investment) जमिनीचा प्लॉट शोधण्यासाठी आले होते. त्यांनी सोन्याची चेन, ब्रेसलेट व पेंडंट घातलेले गढवीला दिसलं. हीच संधी साधून गढवी सातारा यांना एक प्लॉट (Plot) दाखवण्याच्या बहाण्याने 25 एप्रिल रोजी गावाच्या शिवारात घेऊन गेला. तिथे गढवीने सातारां यांचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिकार केला असता आरोपीने त्यांच्यावर सुमारे 12 वार केले, त्यामुळे सातारा यांचा जागीच मृत्यू झाला. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिलंय. (crime news)

सातारा यांचे नातेवाईक मुकेश छेडा यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, मुंद्रा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, गढवी याने सोन्याचे दागिने गहाण ठेवून 1.1 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचं पोलिसांना समजलं आणि चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली असता गढवीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, असं कच्छचे पोलीस उपअधीक्षक जे.एन. पांचाळ यांनी सांगितलं.

दरम्यान, पोलिसांनी गढवीकडून मृताचा चोरलेला मोबाईल फोन तसंच सोन्याची चेन आणि पेंडंटही जप्त केलं. “गढवी हा मजुरी करतो आणि त्याला दोन मुलं आहेत. त्यातील मोठा 12वीत शिकतो तर धाकटा नवव्या वर्गात शिकतो. मोठ्या मुलाच्या होस्टेल आणि शिक्षणाची फी म्हणून 35 हजार रुपये द्यायचे होते त्यामुळे गढवीने हा गुन्हा केला,” असे पांचाळ यांनी बोलताला सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *