सांगलीत चौघांविरोधात गुन्हा दाखल

(crime news) येथील विघ्नहर्ता कॉलनीतील सुश्मिता दीपेश सोमवंशी (वय २७) या विवाहितेचा माहेरहून दागिने व पैसे घेऊन येण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पती दीपेश यशवंत सोमवंशी, सासू रंजनी, दीर शुभम, ननंद स्वाती (रा. अमळनेर, जि. जळगाव) या चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, सुश्मिता यांचा विवाह दीपेश याच्याशी झाला. ते मुंबईत राहण्यास होते. (crime news)

दीपेश याने लग्न करण्यासाठी पाच लाख रुपये कर्ज काढले होते. ते फेडण्यासाठी माहेरहन पैसे व दागिने घेऊन येण्यासाठी चौघा संशयितांनी सुश्मिता यांचा शारीरिक व मानसिक व छळ केला. त्यानंतर सुश्मिता या येथे माहेरी आल्या. याप्रकरणी त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *