राजधानी दिल्लीत बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस

(crime news) राजधानी दिल्लीत (New Delhi) आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला पकडले, त्यावेळी तो मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. दिल्लीतील अलीपूर भागात ही घटना घडल्याची माहिती आहे. आरोपीने मुलीला फूस लावली, त्यानंतर तो तिला जवळच्या जंगलात घेऊन गेला, तिथे तिच्यावर बलात्कार करुन आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत रात्री 8 वाजताच्या सुमारास बालिका घरी पोहोचली आणि तिने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आणि अखेर तो जाळ्यात सापडला.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबातील मुलगी 3 वर्षांपूर्वी कुटुंबासह बिहारमधून दिल्लीत आली होती. मुलीचे कुटुंब मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजता पीडिता तिच्या बहिणीसोबत जवळच्या मंदिरात गेली होती. पीडित मुलगी मंदिरातून पायी जात असताना समीर नावाचा आरोपी तिथे पोहोचला. आरोपीने मुलीला फूस लावली, त्यानंतर तो मुलीला जवळच्या जंगलात घेऊन गेला, तिथे त्याने बालिकेवर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर मुलगी जखमी अवस्थेत रात्री 8 वाजताच्या सुमारास घरी पोहोचली आणि घडलेला प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीय बुधपूरच्या जंगलात मुलीवर बलात्कार झालेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर कुटुंबीयांनी अलीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.

पॉर्न फिल्म पाहताना अटक

आरोपी सुरुवातीला फरार झाला होता. पोलिस पथकाने त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. बराच तपास केल्यानंतर समीर नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. समीर हॉटेलमध्ये काम करतो. पोलिसांनी आरोपी समीरला अटक केली, त्यावेळी तो मोबाईलमध्ये पॉर्न फिल्म पाहत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *