दहावीतील मुलीवर अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांनाही दिल्या धमक्या

(crime news) दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच दारुड्या तरुणाने अत्याचार केला. नंतर त्याच्या भावासह मित्राने पीडितेच्या आई-वडिलांना सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगर गाठले. त्यानंतर शहराजवळीलच एका डोंगरात नेऊन तिचा गर्भपात केला. हा प्रकार २४ जून रोजी घडला. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगू नये, यासाठी पीडितेच्या आई-वडिलांना धमक्या देत गावातून बाहेर काढले. या सर्व प्रकरणाची शनिवारी बीड ग्रामीण ठाण्यात नोंद झाली असून तब्बल १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलीचे आई-वडील दिव्यांग आहेत. गावातीलच तरुण त्यांच्या घराशेजारी असलेल्या एका ढाब्यावर जेवण, दारू पिण्यासाठी येत होता. एके दिवशी घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने तिच्याशी लगट केली. तसेच, दोन ते तीन दिवसाला तिला बोलावून घेत रात्रीच्या सुमारास घराशेजारी असणाऱ्या शेतातच वारंवार अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली. मुलीच्या पाेटात दुखायला लागल्याने तिने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर सोनोग्राफी केली असता ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले.

धमकी देऊन पुण्याला पाठविले त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी आरोपीच्या मित्राला कॉल केला. त्याने हे प्रकरण वाढवायचे नाही, असे म्हणत पीडितेसह तिच्या आई-वडिलांना सोबत घेऊन एका कारमधून छत्रपती संभाजीनगर गाठले. शहराजवळील एका डोंगरातील पत्र्याच्या शेडमध्ये पीडिता व तिच्या आईला नेले. तेथे अगोदरच दोन ते तीन जण थांबलेले होते. त्यांनी पीडितेला गोळ्या दिल्या. त्यामुळे तिला रात्रभर कळा आल्या आणि सकाळी तिची प्रसूती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला; परंतु हे बाळ मयत होते, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पुन्हा पीडितेसह आईला छत्रपती संभाजीनगर शहराजवळच आणून सोडले. त्यानंतर पीडितेसह तिच्या आई-वडिलांना धमकी देत पुण्याला पाठवून दिले. तेथे १५ दिवस राहिल्यानंतर पीडितेच्या चुलत भावाने तक्रार केल्याने हा प्रकार उघड झाला. (crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *