बेपत्ता जैन मुनींच्या शरिराचे ९ तुकडे; ३० फूट खोल बोअरवेलमध्ये सापडला मृतदेह

(crime news) बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडीजवळील हिरेकोडी येथील बेपत्ता जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. रायबागजवळील कटकभावी गावाजवळ मृतदेहाचे नऊ तुकडे बोअरवेलमधून काढण्यात आले आहेत. जैन मुनीजी बुधवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार हिरेकोडी येथील आश्रमातील भक्तांनी शुक्रवारी केली होती. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, जमीन किंवा आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी जैन मुनींचा मृतदेह सापडला. मारेकऱ्यांनी जैन मुनींच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून बोअरवेलमध्ये फेकून दिले होते. कटकभावी गावच्या हद्दीतील बोअरवेलमध्ये मुनींच्या शरीराचे तुकडे टाकून मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बोअरवेलच्या २५ फूट खोलवर रक्ताने माखलेली साडी व टॉवेल आढळून आला. बेळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी तक्रार आल्यानंतर चिक्कोडी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात सापडलेले पुरावे मिळवून माहिती संकलित केली. त्याच दिवशी रात्री स्वामीजींच्या ओळखीची व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आल्याची माहिती समोर आली. तपासात एकाच व्यक्तीने खून केल्याचे निष्पन्न झाले.

मृतदेह शोधमोहीम आणि सुरक्षेसाठी ५०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. स्वामीजींचा मृतदेह ३० फूट खोलवर आढळला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एसपींनी आरोपींची नावे उघड करण्यास नकार दिला. (crime news)

जैन मुनींचे पार्थिव बेळगावला पाठविले

खून झालेल्या जैन मुनींच्या मृतदेहाचे तुकडे कटकबावी येथून शवविच्छेदनासाठी बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. रविवारी हिरेकोडी येथील नंदीपर्वत आश्रमात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती भाविकांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *