टाकळीवाडीच्या ग्रामसेविका श्रीमती अनघा सावगावे ठरल्या किंग मेकर

पत्रकार नामदेव निर्मळे

(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील एका गाईचा पाय भांड्यामध्ये पाय अडकलेला होता. चार-पाच दिवस गाईचा पाय भांड्यामध्ये अडकून असल्यामुळे पायाला जखम झाली होती. नागरिकांची मदत करण्याची इच्छा होती. परंतु कोणी धाडस करत नव्हते. भांड्यामध्ये पाय अडकल्यामुळे त्याच्या पायातून रक्त येत आहे. जखम झालेली आहे. गाईला चालायला सुद्धा येत नाही.

या बातमीची दखल पत्रकार संजय गायकवाड यांनी स्वतः पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू निर्मळे यांना कल्पना दिली. कर्तव्यदक्ष व नुकतेच टाकळीवाडी ग्रामपंचायतचा कारभार स्वीकारलेले ग्रामसेविका मॅडम श्रीमती अनघा सांवगावे यांनी त्वरित तातडीची मीटिंग घेऊन कोल्हापूर येथील रेस्क्यू फोर्स ला पाचारण करून गाईला त्रासातून मुक्त केले.

पायाला जखम झाली होती. पायातून रक्त येत होते. डॉक्टरांनी मलमपट्टी करून इंजेक्शन दिले. तब्बल सहा तास हे रेस्क्यू ऑपरेशन चालू होते. अनेक संकटांना सामना करत गावकऱ्यांच्या वतीने तसेच यल्लमा देवी ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून गाईला वेदना मुक्त केले.

संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन चालू होते. विशेष मुलाचे सहकार्य ग्रामसेविका श्रीमती अनघा सावगावे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू निर्मळे, निलेश वनकोरे, सुधीर गोरे, सतीश पाटील, सद्दाम शेंडुरे, संजय कुंभार, राजू भमाणे, संतोष निर्मळे, व सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत, रेस्क्यू फोर्स कोल्हापूर टीम, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. (local news)

यल्लमा देवी ट्रस्ट व ग्रामपंचायत कडून सर्वांचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे नुकतेच ग्रामसेविका यांनी टाकळीवाडीचा कारभार घेऊन अतिशय चांगले काम केले आहे. सर्वत्र यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *