आठवड्याभरापूर्वी झालेला प्रेमविवाह जीवघेणा ठरला

(crime news) लग्नाच्या अवघ्या सात दिवसांनंतर नवरदेवानं जीव दिल्याची घटना घडली आहे. पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील बनूड परिसरात ही घटना घडली आहे. टॅक्सी चालक तरुणाचा मृतदेह इनोव्हा कारमध्ये सापडला. दिलप्रित सिंग असं त्याचं नाव आहे. आठवड्याभरापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं.

पोलिसांनी दिलप्रितचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला. दिलप्रितनं विष घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सून मनप्रित कौर आणि तिची आई कुलदीप कौर यांच्यामुळेच मुलानं आत्महत्या केल्याचा आरोप दिलप्रितचे वडील बलविंदर सिंग यांनी केला आहे. त्यांना दोघांविरोधान पोलीस तक्रार नोंदवली आहे.

दिलप्रित आणि मनप्रितचा विवाह आठवड्याभरापूर्वी झाला होता. मनप्रित जीरकपूरची रहिवासी आहे. ती बार अटेंडंटचं काम करायची. दोघांची भेट एका लग्न सोहळ्यात झाली. पुढे दोघांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दिलप्रित गावात राहायचा. मात्र लग्नानंतर मनप्रितनं गावी राहण्यास नकार दिला. यावरुन दोघांमध्ये वाद झाले.

(crime news) वाद वाढल्यानंतर दिलप्रित मनप्रितसोबत त्याच्या सासूकडे राहण्यास गेला. मात्र सासू दररोज त्याचा पाणउतारा करायची. एके दिवशी तिनं शेजारपाजाऱ्यांसमोर जावयाला सुनावलं, त्याचा अपमान केला. धक्कादायक बाब म्हणजे यात मनप्रितनंही तिच्या आईला साथ दिली. यामुळे दिलप्रित नाराज झाला. त्याला अपमान सहन झाला नाही. इनोव्हा कारची चावी घेऊन तो निघाला. १७ जुलैला त्याचा मृतदेह बनूड उड्डाणपुलाखाली कारमध्ये सापडला. कारमध्ये विषाची काही पाकिटं सापडली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *