जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती; आज-उद्या अलर्ट जाहीर

जिल्ह्यात बुधवारच्या तुलनेत काल दिवसभर पावसाची (Kolhapur Rain Update) तीव्रता कमी राहिली; मात्र, धरणांच्या आणि नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ (increase) होत राहिली. जिल्ह्यात आज (ता. २१) व शनिवारी (ता. २२) यलो, तर रविवारी (ता. २३) आणि सोमवारी (ता. २४) ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणी पातळी ३४.२ फुटांवर गेली, तर ५९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, संततधार पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्यामुळं कोल्हापुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

राधानगरी धरणात (Radhanagari Dam) एकूण क्षमता ८.३५ पैकी ५.२३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून १२०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढत (increase) आहे.

राधानगरीसह काळम्मावाडी धरणातही समाधानकारक साठा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी केवळ ४.५५ टीएमसी असणारा पाणीसाठा आज आठ टीएमसीपर्यंत वाढला आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातही चांगला पाऊस झाला आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी उशिरा का असेना, सोयाबीन, भुईमूग व भाताची पेरणी केली आहे.

पाण्याखाली गेलेले महत्त्वाचे बंधारे

पंचगंगा : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील : हळदी, सरकारी कोगे, राशिवडे व खडक कोगे.

कासारी : वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण व कांटे.

हिरण्यकेशी – साळगाव, सुळेरान, चांदेवाडी, दाभीळ, ऐनापूर व निलजी.

घटप्रभा – पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानर्डे-सावर्डे व अडकूर

वेदगंगा – निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली.

कुंभी : कळे, शेनवडे, वेतवडे व मांडूकली

वारणा – चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी व कोडोली

कडवी – भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरुड पाटणे

धामणी : सुळे आणि तुळशी : बीड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *