मुलगीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये अन्नदान; शाळेतर्फे व पत्रकार नामदेव निर्मळे यांच्याकडून त्यांचे कौतुक
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री धोंडीराम बाबर सर यांनी मुलगीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर येथे सर्व शिक्षक ,शिक्षिका व विद्यार्थी यांना गोड जेवणाचा आस्वाद दिला.
मुलगी सुद्धा इंजिनीयर आहे. व जावई अमित पाटील हे सुद्धा इंजिनियर आहेत. मुलगी व जावयावर नितांत प्रेम करत त्यांनी हा निर्णय घेतला.
तसेच गुरुजींची पत्नी शोभा बाबर यांचा सुद्धा वाढदिवस १९ जुली रोजी होता. शाळेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पत्रकार नामदेव निर्मळे यांच्याकडून त्यांच सुद्धा कौतुक झाल. (local news)