बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

(crime news) बहीण-भावाचं नातं हे अतिशय पवित्र मानलं जातं. कितीही मोठं संकट आलं तरी ते एकमेकांची साथ देण्यास नेहमी तयार असतात. मात्र आता छत्रपती संभाजीनगरमधून याच नात्याला काळिमा फासणारी अशी घटना समोर आली आहे, जी वाचून धक्का बसेल. या घटनेत सख्ख्या भावानेच आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

भावानेच बहिणीवर बलात्कार केला असल्याचं डीएनए चाचणीत उघड झालं आहे. या प्रकरणात पीडितेच्या सख्ख्या भावासह मावस भावावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित मावस भावावर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी मेहरे यांनी त्याला जमीन मंजूर केला आहे.

गंगापुर तालुक्यातील पीडित मुलीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मावस भावाने ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं म्हटले होतं. मात्र नंतर पीडितेने 24 मार्च 2023 रोजी पुरवणी जबाबात सख्ख्या भावाने शारीरिक संबंध ठेवल्याचं म्हटलं. नाताळच्या सुट्ट्यात 10 दिवस तिचा भाऊ घरी होता. त्यादरम्यान वेळोवेळी त्याने शारीरिक संबंध ठेवले असल्याचं पीडितेनं सांगितलं. (crime news)

पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर डीएनए चाचणी करण्यात आली. यामध्ये सख्ख्या भावाकडूनच बहीण गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पीडितेच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेनं छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *