राधानगरी धरणाचा ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी ८.१५ वाजता राधानगरी धरणाचा (dam) सहा नंबरचा एक दरवाजा उघडला आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Kolhapur Rain) आज २६ जुलै रोजी सकाळी ८.१५ वाजता स्वयंचलित द्वार क्रमांक ६ उघडले आहे. धरणाचा एकूण १ दरवाजा उघडला आहे. या एक दरवाज्यातून १४२८ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. तर पावर हाऊसमधून १४०० क्यूसेक विसर्ग सुरु आहे. एकूण विसर्ग २,८२८ क्यूसेक सुरु आहे. धरणातील पाणी पातळी ३४७.३६ फूट इतकी आहे.

सहा नंबरचा दरवाजा खुला

संपूर्ण जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण पूर्ण संचय क्षमतेने भरले आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने धरणाची पाणी पातळी स्थिर होती. आज पहाटे जोर वाढल्याने पहाटे 8.15 वा. धरणाचा सहा नंबरचा दरवाजा खुला झालं आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे जिल्ह्यातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

या दरवाजातून 1428 क्युसेक्स व धरणातून (dam) खासगी वीजनिर्मितीसाठी 1400 क्यूसेक्स असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे. धरणात पाणी पातळी ३४७.३६ फूट इतकी झाली आहे. 347.50 फूट पाणी पातळीला धरण पूर्ण क्षमतेने भरते.पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रवीण पारकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *