खळबळजनक! नांदणीमध्ये शेतात सापडली मानवी कवटी आणि ‘या’ वस्तू

नांदणी (ता. शिरोळ) येथे शेतकरी आपल्या शेताची (farm) नांगरट करीत असताना फाळाला मानवी कवटी तसेच हाडे, काळे पांढरे केस, साडी, परकर, ब्लाऊज आदी वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिरोळ पोलिसांनी या सर्व वस्तूंचा पंचनामा करून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याकरिता जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांकडून याबाबत माहिती मागवली आहे. सापडलेल्या वस्तूंच्या अनुषंगाने या वस्तू, कवटी व हाडे महिलेच्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत शिरोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, माणगावकोडी नांदणी येथील शेतकरी व ट्रॅक्टर चालक राकेश आप्पासाहेब पाटील हे आपल्या शेतात शाळू पिकाची पेरणी करण्याकरिता ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट करीत होते.

यावेळी ट्रॅक्टरच्या फाळाला लागून मातीतून मानवी कवटी वरती आली. काही अंतरावर शेतात (farm) ठिकठिकाणी व कंपाउंडलगत मानवी हाडे, काळे-पांढरे केस, मळकटलेला परकर, गुलाबी रंगाची साडी, त्यावरती हिरव्या जांभळ्या रंगाची फुलाची डिझाईन, चॉकलेट रंगाचा फाटलेला ब्लाऊज तसेच स्टीलचा डबा आढळून आले. डब्याच्या झाकणावर गंगुबाई कोळी असे नाव कोरलेले आहे. शिरोळ पोलिसांनी सापडलेल्या सर्व वस्तूंचा पंचनामा करून त्या ताब्यात घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *